
शाश्वत उपजीविकेची संधी देणारे ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र’..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली, दि. 2
विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) हे गोंडवाना विद्यापीठाच्या सहकार्याने स्थापन झालेली एक स्वायत्त संस्था आहे. एस.टी.आर.सी.कडे विशेषत: गडचिरोली विभागातील उपेक्षित असलेल्या आदिवासी समुदायांसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच शाश्वत मूल्य निर्मितीसाठी उत्कृष्टतेचे केंद्र म्हणून मानवी क्षमता विकासासाठी स्थानिक संसाधने, संबंधित ज्ञान आणि योग्य तंत्रज्ञानाचा लाभ एस.टी.आर.सी. देत आहे. त्यासोबतच, गडचिरोली क्षेत्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित विकासासाठी उत्प्रेरक म्हणून विद्यापीठाचे ज्ञान-आधारित उपक्रम व क्षेत्रातील उपजीविका वाढ यांच्यातील दुवा म्हणून विज्ञान आणि तंत्रज्ञान संसाधन केंद्र (STRC) कार्य करीत आहे. त्यामुळे एस.टी.आर.सी.या भागातील स्थानिकांना शास्वत उपजीविकेची संधी देणारे केंद्र बनले आहे.
एस.टी.आर.सी.स्पष्टपणे परिभाषित प्रभाव प्रेरित उद्दीष्टांची कल्पना करते. ज्यामध्ये, एस अँड टी (S&T) आधारित उपजीविका उपक्रमांची रचना, किफायतशीर तंत्रज्ञानासाठी संशोधन आणि उष्मायन, त्याचे हस्तांतरण आणि अवलंब, ज्ञान-कौशल्य आणि तंत्रज्ञानाद्वारे मानवी क्षमतांचा सर्वांगीण विकास, शाश्वत उत्पन्न निर्मितीसाठी नैसर्गिक संसाधनांच्या सानिध्यात ग्रामीण उपक्रम, विकास आणि संबंधित उपक्रमांचा विस्तार करण्यासाठी आयसीटी (ICT ) च्या माध्यमातून विकासासाठी संवाद आदी विस्तृत विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
एस.टी.आर.सी.ने विविध उपक्रमावर यशस्वीरित्या काम केले आहे. त्यासोबतच, उत्पादन आणि मूल्यनिर्मिती योजनेतून मत्स्यपालन उपजीविका, बांबू कला उपजीविका, गौण वनउपज, औषधी वनस्पती या उपजीविका विभागासोबतच संशोधन आणि शैक्षणिक कार्यक्रम विकास, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासासाठी संवाद आदी विभाग विकसित केले आहेत.
उपजीविका विभाग व उद्दिष्टे:
मत्स्यपालन उपजीविका: स्थानिक मत्स्य शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट दर्जाचे मत्स्यबीज आणि खाद्य यांच्या वाढीव उत्पादन व उपलब्धतेवर लक्ष केंद्रित करणे. मत्स्यउत्पादक गटाच्या माध्यमातून मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रगत आणि शाश्वत दृष्टीकोन बाळगणे.
बांबूकला उपजीविका : बांबू आधारित उपजीविका क्षेत्रात कारागीर केंद्रित दृष्टीकोन असलेली उद्योजकीय इको-सिस्टम विकसित करणे, विशेष क्षमता निर्माण कार्यक्रमांची रचना करणे, युटिलिटी क्राफ्ट आणि लाइफस्टाइल प्रोडक्ट स्पेसमध्ये प्रोडक्ट पोर्टफोलिओ विकसित करण्यासाठी नाविन्यपूर्ण किफायतशीर क्राफ्टटूल्स तयार करणे, समुदायाच्या नेतृत्वाखालील बहु-भागधारक विकास आराखड्याद्वारे वित्तीय संस्था आणि स्थानिक उपक्रम यांच्यातील संबंध प्रस्थापित करणे.
गौण वनउपज, औषधी वनस्पती आणि इतर उपजीविका: उत्कृष्ट वनसंवर्धन आणि कृषी पद्धतीद्वारे रोजगार सुनिश्चित करणे, उपयुक्त संशोधनाद्वारे किफायतशीर साधने, तंत्रज्ञान आणि त्यांचा व्यापक प्रचार, गौणवन उत्पादनाभोवती सामुदायिक उपक्रम विकास करणे ज्यामुळे शाश्वत उत्पन्न निर्मितीस चालना मिळेल.
संशोधन आणि शैक्षणिक कार्यक्रम विकास: वैज्ञानिक ज्ञान, कौशल्य आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मानवी क्षमताविकास सक्षम करण्याकरीता शैक्षणिक कार्यक्रम तयार करणे, संशोधन आणि नवोपक्रमाद्वारे शैक्षणिक-अशैक्षणिक संशोधन आणि विकास सुलभ करणे, ज्ञान, भागीदारी, इंटर्नशिप, संशोधन अभ्यास आणि सर्वेक्षणासाठी संसाधन संस्था, विद्यापीठे, सरकारी संस्था आणि एनजीओ सोबत सहयोगी प्रयत्न करणे.
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विकासासाठी संवाद: माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन जनजागृती करण्यासाठी एक साधन म्हणून ज्ञान, सक्षम विकास आणि दुर्लक्षित समुदायांचे सक्षमीकरण, मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे विविधता असलेल्या प्रेक्षकांकरीता माहितीपूर्ण तसेच शैक्षणिक विकास संप्रेषण संसाधने डिझाइन करणे आदी उद्दीष्टे आहेत.
एस.टी.आर.सी.अंतर्गत अभिनव उपक्रम:
वैद्य चिकित्सालय: स्थानिक नागरिकांमध्ये पारंपारिक वैद्य आणि त्यांच्या उपचार पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी एक अद्वितीय विद्यापीठ स्तरावरील व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
वैदू डिरेक्टरी: स्थानिक पारंपारिक उपचार करणारे वैद्य आणि वनस्पती आधारित उपचार पद्धतीची नोंदवही.
मॉडेल प्रोडक्शन युनिट: प्रशिक्षित कारागिरांचे समूह तयार करणे, नाविन्यपूर्ण उत्पादन संशोधन, बहुस्तरीय उद्योजकता नेटवर्क आणि प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी केंद्र.
बांबूमध्ये डिप्लोमा,उद्योजकता व रचना: बांबू उद्योजकता केंद्रित अभ्यासक्रमासह बांबू क्षेत्रातील कुशल तज्ञांद्वारे मानव संसाधन तयार करण्याकरीता प्रकल्प तयार करण्यात आला आहे.
शास्त्रोक्त पद्धतीने काढणी, सुयोग्य साठवण पद्धती, व प्रमुख गौण वनउपजांचे एकत्रीकरण: निवडक गौण वनउपजांचे एकत्रीकरणासाठी वैज्ञानिक काढणी आणि साठवण पद्धतीद्वारे रोजगार सुनिश्चित करणे.
आदिवासी शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण: अनौपचारिक मॉड्यूल ‘वर्गाच्या पलीकडे’ आधारित इकोलॉजी आणि पर्यावरणाचे तसेच जैवविविधतेचे महत्त्व लहान मुलांना शिकवण्यासाठी अभिनव उपक्रम.
बांबू आधारित समुदाय उद्यमशीलता: जनसमुदाय एकत्रीकरण मोहीम, प्रशिक्षण, क्षमता निर्माण कार्यक्रमामुळे लघुउद्योग समूहांची स्थापना.
वेबआधारित समुदाय संवाद प्लॅटफॉर्म: स्थानिक विकासाच्या उपायांसाठी, सामाजिक तसेच तांत्रिक सहाय्य प्रदान करण्यासाठी द्वि-मार्गी समुदाय संवाद मंच.
फिरते प्रात्यक्षिक युनिट : चित्ररथाद्वारे ऑडिओ-व्हिज्युअल परस्पर संवाद प्लॅटफॉर्म जे स्थानिक समुदायांना सक्षम करण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि माहितीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वापरला जातो.