संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन निबंध स्पर्धेचे होणार बक्षीस वितरण
मुख्य संपादक

“संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन!
निबंध स्पर्धेचे होणार बक्षीस वितरण !
गडचिरोली,
दि. 08/5/24/
जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचाराचा प्रचार-प्रसार व्हावा, यादृष्टीने गोंडवाना विद्यापीठातील जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राच्यावतीने विविध उपक्रम राबविले जातात. या अध्यासन केंद्राच्यावतीने “संत तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील सामाजिकता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. 10 मे 2024 रोजी दुपारी 12 वाजता, विद्यापीठ सभागृहात पार पडणार आहे.
व्याख्यान कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुरखेडा येथील गो. ना. मुनघाटे कला, विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर असणार आहे. तर प्रमुख अतिथी मा. प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, मा. कुलसचिव डॉ. अनिल हिरेखण, अध्यासन सल्लागार समितीचे सदस्य डॉ. विद्याधर बनसोड आणि सिनेट सदस्य डॉ. दिलीप चौधरी यांची उपस्थिती असणार आहे.
सदर कार्यक्रमामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्यावर आधारित विद्यापीठस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. हेमराज निखाडे यांनी कळविले आहे.