आदर्श पदवी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

आदर्श पदवी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ,मोठ्या उत्साहात साजरी…
गडचिरोली
दिनांक 03/01/2025.
गोंडवाना विद्यापीठाचे घटक असलेले आदर्श पदवी महाविद्यालयात आद्यशिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन मोठ थाटात करण्यात आले.
कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मा.वैशाली येगोलपवार (अधिव्याख्याता,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली),प्रमुख अतिथी म्हणून मान.योगेंद्र शेंडे व डॉ.कृष्णा कारू,प्राचार्य आदर्श पदवी महाविद्यालय, मा. भरत घेर (समन्वयक) इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
या वेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या भाषण व गीताच्या प्रस्तुतीतून सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावर व कर्तुत्वावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय भाषणात माननीय प्राचार्य कृष्णा कारू यांनी मुलींना भविष्याच्या वाटचाली साठी क्रांतिज्योती कडून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित केले तर मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या येगलोपवर मॅडम यांनी सावित्रीबाई फुलेंच्या जीवनावरील विविध प्रसंग सांगून विद्यार्थांना उज्वल भविष्यासाठी शिका, संगठित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश दिला.
कार्यक्रमाचे व्यवस्थापन यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन सहा.प्राचार्या प्राजक्ता घोटेकर,आभार प्रदर्शन सह.प्राचार्या प्राची इंकने यांनी केले, महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, प्राचार्य व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला.