
रणरागिणी ! बिबट्याच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार करत ताराबाईने केली पतीची सुटका
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 31/12/2024.
आरमोरी तालुक्यातील घटणा ,
सरपण गाेळा करून बैलबंडीत भरत असतानाच झुडपातून अचानक बिबट्याने चार जणांवर एकापाठाेपाठ हल्ला चढविला. यात एक जाेडपे हाेते. आपल्या पतीवर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसताच महिलेने बिबट्याच्या डाेक्यावर कुऱ्हाडीच्या मुंदे(मागील बाजू)ने वार करीत पतीची सुटका केली. हा थरार आरमाेरी तालुक्याच्या नागरवाही जंगलात साेमवार, ३० डिसेंबर राेजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडला. बिबट्याच्या हल्ल्यात दाेघेजण गंभीर जखमी तर दाेघे किरकाेळ जखमी झाले.