
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बढतीचा आनंद घेतला वनविभागाने ।
गडचिरोली
दि.३०/९/२०२४.
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची बढती होऊन, नुकतेच ते गडचिरोली सोडून जाण्याच्या मार्गावर असताना. आनंदमय एका वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वनविभागातील कास्ट डेपोत कोंबड्या, बकऱ्यांची पार्टी देऊन आपला आनंद व्यक्त केल्याचे वनविभागात चर्चिले जात आहे.
मधधुंद आणि मांसाहारी पार्टीत अनेक वनपरिक्षेत्रांनी वनकायदा व त्याचे नियम बाजूला ठेवून मोठ्या संख्येने आप आपली उपस्थिती दर्शवून कोंबड्या मटणांचा मुखआस्वाद घेतला. गेल्याचे सांगीतले जात आहे.
गडचिरोली वनकास्ट डेपोत झालेल्या आनंदमय मटन बकरा पार्टी शहरात एक खमंग चर्चेचा विषय बनलेला असून जाता जाता त्यांनीआतपर्यंत किती कमविले त्यांच्या कमाईची चर्चा अनेकांच्या मुखात चर्चिले जात आहे.