
असाही योगायोग ! 23 नोव्हेंबरला ला जेव्हा निकाल लागणार, त्याचवेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्षे पूर्ण होणार
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम
दिनांक 22/11/2024.
विधानसभा निवडणुकांचे निकाल २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. मात्र या २३ नोव्हेंबरचा एक विलक्षण योगायोग आहे, पाच वर्षापूर्वी याच दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचा शपथविधी केला होता. यामुळे आता या तारखेची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
२०१९ च्या निवडणुकीत सरकार कोण स्थापन करणार या चर्चा सुरू होत्या. शिवसेनेने भाजपसोबत चर्चा थांबवल्यामुळे मोठा पोच निर्माण झाला होता. अनपेक्षीत राजकीय घडामोडीत देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ च्या भल्या पहाटे शपथविधी उरकला होता. हा पहाटेचा शपथविधी सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात टीकेचा विषय बनला होता. आता त्याच दिवशी मतमोजणी होणार असल्याने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.