
हायवा ट्रकच्या मागील चाकात आल्याने एका वृद्धाचा झाला चेंदामेंदा
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दि. १४जाने. 2024 .
चामोर्शी : तालुक्यातील आष्टी येथील शितल रेष्टारंट च्या पुढे
एका हायवा ट्रकच्या अपघातात ईसमाचा चेंदामेंदा झाला.मृतकाचे नाव कालीपद राजेन्द्र विश्वास वय ८० रा. आष्टी असेअसून हायवा ट्रक क्रमांक एम एच ३३ टी ७४७४ असे आहे सविस्तर असे की, हायवा ट्रक हा शितल रेष्टारंट च्या पुढे उभा ठेवण्यात आला होता. ट्रक चालक नितीन सुधाकर कन्नाके वय ३० रा. मार्कंडा (कं) याने आपल्या ताब्यात असलेला ट्रक घेऊन आंबेडकर चौकाकडे जाण्यासाठी निघाला मात्र मृतक म्हातारा मागील चाकात आल्याने त्याचा चेंदामेंदा झाला हि घटना आज दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक कुंदन गावडे व सहकारी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. ट्रक व चालक यास ताब्यात घेतले आहे .अधिक तपास पोलीस करीत आहेत.