दारिद्र्यरेषेखालील विधवा आणि घटस्फोटित महिलांना पिंक ई-रिक्षा’ योजनेसाठी प्राधान्य ,सरकार कडुन 20%अर्थसहाय्य ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .

दारिद्र्यरेषेखालील विधवा आणि घटस्फोटित महिलांना पिंक ई-रिक्षा’ योजनेसाठी प्राधान्य ,सरकार कडुन 20%अर्थसहाय्य ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक 25/12/24.
महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिलांच्या रोजगारनिर्मितीस चालना देऊन त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी राज्य शासनाने ‘पिंक ई-रिक्षा’ योजना राबविली आहे. विशेषतः दारिद्ररेषेखालील, विधवा आणि घटस्फोटित महिलांना या योजनेसाठी प्राधान्य दिले जाणार आहे. महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना केवळ १० टक्के रक्कम भरावी लागणार असून २० टक्के अर्थसहाय्य राज्य सरकारकडून करण्यात येणार आहे. उर्वरित ७० टक्के रक्कम बँकांमार्फत कर्ज स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. जिल्हास्तरावर अग्रणी बँकांची यादी तयार करण्यात आली आहे, तसेच या बँकांसोबत करार देखील करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिवेशनात ही योजना चर्चेत आली होती. महिलांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने योजनेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.