देश-विदेश
संतापजनक ; 1999 रुपयात महाकुंभमधील मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो विक्रीला ; FIR दाखल ।

संतापजनक ; 1999 रुपयात महाकुंभमधील मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो विक्रीला ; FIR दाखल ।
दि 22/2/25.
उत्तर प्रदेश,
महाकुंभ मेळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज इथं पोहचले. त्यात महिलाही अधिक होत्या. पवित्र गंगा स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी त्रिवेणी संगमावर झाल्याचं पाहायला मिळत होते. मात्र याच ठिकाणी महिलांचे कपडे बदलणारे आणि आंघोळीचे फोटो सोशल मीडियावर विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचं गांभीर्य लक्षात घेऊन महाकुंभ परिसरातील कोतवाली पोलिसांनी १५ सोशल मिडिया चॅनेलविरोधात FIR दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.