
चित्रनगरीत होणार वस्तुसंग्रहालय जुने पोस्टर, चित्रपट , पाहायला मिळणार !
कोल्हापूर,
कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचे केंद्र आहे. याच सांस्कृतिक वारशाचे जतन व्हावे, यासाठी कोल्हापूर चित्रनगरीत लवकरच एक भव्यदिव्य वस्तुसंग्रहालय बांधण्यात येत येणार आहे. या वस्तुसंग्रहालयात चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, चित्रपटांचे पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स अशी विविध स्मृतिचिन्हे ठेवण्यात येईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली.