
तुळजापूरच्या घाटात उलटली मोशीच्या भाविकांची ट्रॅव्हल्स, एक महिला ठार 45 जण जखमी l
दिनांक 30 1 2025
पुणे,
पुणे जिल्ह्यातील मोशी येथून तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेली खाजगी बस बुधवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरालगतच्या घाटात उलटली. या घटनेत एका महिला भाविकाचा मृत्यू झाला असून, ४५ भाविक जखमी झाले आहेत. यातील १८ जण गंभीर असल्याने त्यांना धाराशिवच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.