Breaking
चंद्रपूर

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसीलदाराची धाड… तहसीलदारांनी ट्रँक्टर घेतला ताब्यात !

मुख्य संपादक

 

अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तहसीलदारांनी घेतला ताब्यात…

 

पोंभूर्णा : –

अंधारी नदी भिवकुंड घाटातून अंधाऱ्या रात्रीचा फायदा घेत रेतीची अवैध वाहतूक करणारा ट्रॅक्टर बुधवार दि.२० मार्चच्या मध्यरात्री दिड वाजताच्या सुमारास पोंभूर्णा एमएसईबी ऑफीसजवळ तहसीलदारांनी पकडून तहसिल कार्यालयात जमा केले.

 

तालुक्यात रेतीघाटांचे लिलाव झालेले नाही व या दिवसात रेती उपसा पूर्णपणे बंद आहे. असे असताना रेती माफिया अंधाराचा फायदा घेत अवैध रेती वाहतूकीचा सपाटा लावला आहे.पोंभूर्णा तालुक्यातील अंधारी नदी भिवकुंड घाटातून रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी कदम यांना मिळताच बुधवार दि.२० मार्चला मध्यरात्रीनंतर दिड वाजताच्या सुमारास रुपेश चन्नावार यांच्या मालकीची अवैध रेती वाहतूक करणारी ट्रॅक्टर क्र. एमएच ३४ बीएफ-१७७५ व ट्राली क्र. एमएच ३४ बीव्ही ७३७७ पकडुन तहसीलदार यांनी तहसील कार्यालयात जमा केली.महसूल अधिनियम १९६६चे कलम ४८(७)व (८)अन्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे