गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन
मुख्य संपादक

गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन…
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली :-
गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी झाडीपट्टी रंगभूमीचे जेष्ठ नाट्यकलावंत पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांचे ‘ झाडीपट्टी रंगभूमीचे वास्तव ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे, कार्यक्रम समन्वयक म्हणून मराठी विभागाच्या स.प्राध्यापिका डॉ. सविता गोविंदवार मंचावर उपस्थित होते.अतिथींचा परिचय मराठी विभागाचे स. प्रा.डॉ. हेमराज निखाडे यांनी करून दिला.
कार्यक्रमात मराठी भाषा अभ्यास मंडळाच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष शुभम गुरनुले, उपाध्यक्ष माधुरी मेश्राम, सचिव डाकराम कोहपरे, कोषाध्यक्ष रेशमा मडावी आणि मंडळातील इतर सदस्य विद्यार्थ्यांचे अतिथींच्या हस्ते पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभागातील स. प्रा.डॉ. निळकंठ नरवाडे यांनी तर आभार स. प्रा. अमोल चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.