Breaking
क्रिडा व मनोरंजनगडचिरोली

पश्चिम विभागीय बुडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी , खेळाडुंनी विविध गटामध्ये पटकाविली पदके

जेएनसीटी प्रोफेशनल युनिव्हर्सिटी भोपाळ येथे स्पर्धेचे आयोजन

 

पश्चिम विभागीय बुडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाची उत्कृष्ट कामगिरी , खेळाडुंनी विविध गटामध्ये पटकाविली पदके !

 

जेएनसीटी प्रोफेशनल युनिव्हर्सिटी भोपाळ येथे स्पर्धेचे आयोजन !

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

 

गडचिरोली, दि. 18:

जेएनसीटी प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, भोपाळद्वारा चार दिवसीय ए.आई.यु. विभागीय बुडबॉल स्पर्धेचे आयोजन 8 ते 11 मे 2024 या कालावधीत भोपाळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भारतातील 35 विद्यापीठातील 550 महिला व पुरुष खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये गोंडवाना विद्यापीठातील महिला व पुरुष खेळाडूंनी देखील सहभाग नोंदविला होता.

 

 

 

या विभागीय स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठातील सहभागी खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विविध गटात पदके प्राप्त केली. सदर स्पर्धेमध्ये, गोंडवाना विद्यापीठाने फेअरवे टिम इव्हेंट (महिला) गटात कांस्यपदक तर स्ट्रोक डबल इव्हेंट (पुरुष) गटात रजत पदक, फेअरवे टिम इव्हेंट (पुरुष) गटामध्ये कांस्यपदक पटकाविले यामध्ये 1 रजतपदक तर दोन कांस्यपदकाचा समावेश आहे. सदर संघासोबत संघव्यवस्थापक डॉ. संघपाल नारनवरे, प्रशिक्षक शाहरुख शेख होते.

 

 

या स्पर्धेकरीता खेळाडूंना क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. खेळाडुंनी केलेल्या उत्कृष्ठ कामगिरीबद्दल गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे आणि कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन यांनी खेळाडूंचे कौतूक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे