
25 वर्षीय तरुणाचा गावाजवळील शेतशिवारात संशयास्पद मृत्यू !
जैरामपुर
आष्टी –
आष्टी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जैरामपूर येथे 25 वर्षीय अविवाहित तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना दिनांक 10 फेब्रुवारीला सोमवारी उघडकीस आली.
सुभाष मारोती गेडाम वय 25 वर्ष रा. जैरामपुर तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली असे मृतक तरुणाचे नाव आहे.
मृतक सुभाष मारोती गेडाम कब्बडी पाहण्यासाठी बाहेर गावी जात आहे असे सांगून राहत्या घरातून रवीवारी घराबाहेर पडला मात्र रात्री उशिरापर्यंत सुभाष घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध केली.10 फेब्रुवारी सोमवारी सकाळच्या सुमारास सुभाष याचा मृतदेह गावालगत असलेल्या शेताच्या पाळीवर आढळून आला. घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा करून त्याचा मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्प्रयात आला शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे आष्टी पोलीस या मृत्यू प्रकरणाची कसून चौकशी करीत असुन शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.मृतक सुभाष हा शेतीची कामे करायचा. या घटनेमुळे जैरामपूर परीसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. अधिक तपास आष्टी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करित आहेत.