
कर्करोग रुग्णांबरोबर साजरे केले ” अपना घर ” नागपूरचे दुसरे वर्धापनदिन…
नागपुर :-
दिनांक 03 जाने.2024
नागपूर शहरात रोज शासकीय व निमशासकीय रुग्णालयात कर्करोगाचा उपचारासाठी वेगवेगळ्या राज्य व जिल्यातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. रुग्णालया मध्ये त्यांना उपचार तर मिळत असते परंतु राहणे, खाणे, पोषक वातावरण आणि आर्थिक अडचण इत्यादी कारणामुळे अनेक रुग्ण आपले उपचार पूर्ण करू शकत नाहीत. अश्या रुग्णांनी आपले उपचार पूर्ण करावे त्यांना उपचाराबरोबरच पोषक आहार, आनंदित वातावरण मिळावे या उद्देशाने नागपुरमध्ये मागील दोन वर्षापासून इंटास फॉउंडेशन या संस्थेने “अपना घर” नावाचा प्रकल्प सुरु करून ७०० पेक्षा जास्त रुग्णांना नि:शुल्क सेवा दिलेली आहे. ०३ जानेवारी २०२४ ला अपना घर या प्रकल्पला नागपूर मध्ये दोन वर्ष पूर्ण झालेली आहे. त्यानिमित्याने कर्करोगी व त्यांच्या नातेवाईक आणि अपना घरचे प्रकल्प सहाय्यक श्री.निखिल वैद्य, समुपदेशक कालिदास वडमे, प्रविणा गेडाम आणि इतर कर्मचाऱ्यांसोबत दुसरे वर्धापनदिन साजरा कारण्यात आले.
आपना घर मध्ये रुग्णांना व त्यांच्या एका नातेवाईकांना राहण्यासाठी सुसज्य खोली, पोषक आहार, रुग्णालयात जाण्या- येण्यासाठी वाहतुकीची सुविधा निःशुल्क उपलब्ध आहे. आणि त्याचबरोबर मानसिक दृष्ट्या सुदुढ बनवण्याचे कार्य व दैनंदिन मूलभूत गरजांची काळजी अपना घर मध्ये घेतली जात आहे. पुढे भविष्यात जास्तीत जास्त गरजू रुग्णांन पर्यत पोहचण्याची व त्यांना नि:शुल्क उच्च दर्जाच्या सेवा देण्याचे धैर्य इंटास फॉउंडेशनचे आहे.