एकाच कुटूबीयातील व्यक्तींना दोन दोन घरकुले! घरकुल प्राप्तीसाठी रेशन कार्ड व आखीव पत्रिका करून घेतात वेग वेगळी
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

एकाच कुटूबीयातील व्यक्तींना दोन दोन घरकुले!
घरकुल प्राप्तीसाठी रेशन कार्ड व आखीव पत्रिका करून घेतात वेग वेगळी
गडचिरोली.
संपादक.
अनुप मेश्राम.
शासनाची रमाई योजना असो.किंव्हा पंतप्रधान घरकुल आवास योजना असो.
या दोन्ही शासकीय योजनेच्या माध्यमातून घरकुलाचा लाभ घेण्यासाठी एकाच घरात वास्तव्य करणाऱ्या अनेक कुटुंबियांनी घरकुलाचा लाभ मिळवण्यासाठी आपल्या मुलाला, नातवाला, सुनेला कुटुंबापासून अनेक दिवसापासुन अलीप्त असल्याचे दाखवून गडचिरोली शहरातील, व ग्रामीण भागात वास्तव्य करणाऱ्या अनेक लोकांनी शासकीय घरकुल योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घेताना दिसून येत आहेत.
तर कितेक कुटुंबीयांनी आपल्या मुलांच्या, सुनेच्या नावाने त्यांची आखीव पत्रिका, व रेशन कार्ड वेगवेगळे काढून व आपला मुलगा आपल्या कुटुंबापासून वेगळे असल्याचे शासन दरबारी दाखवून. आखीव पत्रिका व रेशन कार्ड काढण्याचा जणू सपाटाच या घरकुल लाभार्थ्यांनी सुरु केलेला आहे.
ही योजना राबविनारी शासकीय यत्रणा सुद्धा.शासन का पैसा हें! हमारा क्या जाता हें!देख लेंगे असे प्रशासनात बसलेले अनेक माहारती संधीचे सोने करून
सबंधित व्यक्तीच्या कुटुंबियांची साधी चौकशीही न करता डोळे बंद करून घरकुले देण्याचा जणू सपाटाच सुरु केलेला आहे.
याला जबाबदार कोण? असे अनेक तर्क वितर्क आपआपसामध्ये लढविली जातं आहे.ज्यांना स्वतःच्या हक्काची घरे नाही. वर्षभर प्रशासणाच्या पायऱ्या झीजविताना दिसत आहे. जिल्हा प्रशासन यां घरकुल लाभार्थ्यांच्या घराची चौकशी करेल काय?