
वनसंरक्षक कार्यालयापुढे सत्यवान रामटेके यांचे आमरण उपोषण!
गडचिरोली.(दि,25 सप्टेंबर )
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत देसाईगंज,कुरखेडा,आरमोरी व कोरची तालुक्यात पूर्वी झालेल्या व हल्ली सुरू असलेल्या वृक्ष लागवडीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला असून, झालेल्या संपूर्ण भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी २ मे २०२३ व ३ ऑगस्ट २०२३ ला सत्यवान रामटेके यांनी देसाईगंज तहसील कार्यालया पुढे दोनदा आमरण उपोषणाला बसले होते.
दोनदा आमरण उपोषणाला बसल्या नंतर सबंधित विभागाने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा तर्फे लिखित पत्र देण्यात आले. परंतु सबंधित विभागाने आतापर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी व सबंधितावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नसल्यामुळे तिसऱ्यांदा आज २५ सप्टेंबर २०२३ पासून सर्वप्रथम दोषींवर कारवाई करण्या संदर्भात गडचिरोली मुख्य वनसंरक्षक कार्यालया समोर सत्यवान रामटेके यांनी आमरण उपोषण सुरू केलेले आहे.
देसाईगंज सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत येणाऱ्या चारही तालुक्यात ३३ कोटी वृक्ष लागवड राज्य योजना व इतर योजने अंतर्गत करोडो रुपयांची कामे करण्यात आली.मात्र झालेल्या कामांवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे.
वृक्ष लागवडीच्या ठिकाणावर वृक्षांसभोवताल कुंपण नाही,माहितीचे फलक(बोर्ड)नाही,विविध प्रजातींचे वृक्ष लागवड नाही,काही अंतरावर वृक्षेच दिसून येत नाही.सदर या सर्व बाबींची तरतूद अंदाजपत्रका मध्ये असतांनाही नियमबाह्य कामे करून शासनाच्या लाखो रुपयांवर पाणी मुरले गेले आहे.
तसेच रस्ता दुतर्फा तसेच गट लागवडीच्या कित्तेक साईटवर जिवंत रोपांची टक्केवारी कमी असतांना सुद्धा जिवंत रोपांची टक्केवारी जास्त दाखवून निधीची मागणी करून शासनाचे लाखो रुपये घशात ओतले गेले आहेत.
उपोषणाच्या माध्यमातून वारंवार झालेल्या सबंधित कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सत्यवान रामटेके यांनी केली असतांना सुद्धा सबंधित विभाग -उडवा उडवीचे उत्तरे देऊन सामाजिक वनीकरण विभागाचेअधिकारी,कर्मचारी वृक्ष लागवडीवर झालेल्या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यास वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे.यामध्ये कार्यरत असलेले तत्कालीन विभागीय वन अधिकारी भडके,विभागीय वन अधिकारी मनोज चव्हाण व देसाईगंज (वडसा)सामाजिक वनीकरण विभागाचे तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी हिरा बारसागडे यांना गडचिरोली सामाजिक वनिकरण कार्यालयाकडून शह देण्याचा प्रकार दिसून येत आहे