विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते मौजा ,जिबगाव येथील कॅन्सरग्रस्त महिलेस आर्थिक मदत…
मुख्य संपादक

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या हस्ते, जिबगाव येथील कॅन्सरग्रस्त महिलेस आर्थिक मदत…
मुख्य संपादक
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिनांक : २५ सप्टेंबर २०२३.
सावली :- /
विरोधी पक्षनेते,माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.श्री. विजयभाऊ वडे्ट्टीवार यांच्यातर्फे मौजा. जिबगाव येथील कॅन्सरग्रस्त महिला कविता विलास नागापुरे, वय ५३ वर्ष यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे व जिबगांवचे सरपंच मा.पुरषोत्तम चुदरी यांच्या हस्ते आर्थिक मदत देण्यात आली.
जिबगाव येथील कविता नागापुरे वय ५३वर्ष ह्या मागील काही दिवसापासून आजारी असल्यामुळे उपचार घेत होते उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे स्पष्ट केले, घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्याने आज कॅन्सर तपासणी हॉस्पिटल शिबीर जिबगाव येथे उपस्थित असता सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांना कविता नागापुरे यांना पुढील उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सरपंच मा.पुरषोत्तम चुदरी यांनी दिली.मा.नितीन गोहने यांनी तात्काळ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांना संपर्क करून तात्काळ कविता नागापुरे यांना आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे, जिबगांवचे सरपंच मा.पुरषोत्तम चुदरी,व्याहाड खुर्दचे माजी सरपंच व ग्रा.पं.सदस्य मा.केशव भरडकर, काँग्रेस कार्यकर्ते मा.अरुण पाटील वरगणटीवार,सेवा सहकारी सदस्य मा.मुखरू पाटील गोहने,मा.नथ्थुजि राऊत,काँग्रेस जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम आदी उपस्थित होते.