द्रुष्टिहिन सिमरन शर्मा ने दिली जगाला भारताकडे पाहण्याची नवी द्रुष्टी भिंगरीसारखी धावली , अन् पटकावला मेडल
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

द्रुष्टिहिन सिमरन शर्मा ने दिली जगाला भारताकडे पाहण्याची नवी द्रुष्टी भिंगरीसारखी धावली , अन् पटकावला मेडल
दणका कायद्याचा डिजिटल न्युज.
दिनांक 8//9 /2024.
भारताच्या सिमरन शर्मानं शनिवारी ७ सप्टेंबरला झालेल्या पॅरिस पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिला गटातील २०० मीटर टी-१२ प्रकारात फायली बाजी मारली. २४.७५ सेकंद वेळ नोंदवत तिने भारतासाठी यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील २८ वे पदक निश्चित केले.
सिमरन शर्मा ही महिला गटातील १०० मीटर टी-१२ प्रकारातही सहभागी झाली होती. पण यावेळी तिचे पदक सेकंदाच्या अवघ्या काही भागांनी हुकले होते. ०.०५ सेकंद एवढाच काय तो फरक. अन् पदक मिळता मिळता राहून गेले. पण पोरीनं जिद्द सोडली नाही. जे झालं ते विसरुन ती मैदानात उतरली अन् जे घडलं ते साऱ्या जगानं पाहिले. या दृष्टिहिन पोरीनं डोळस लोकांसमोर भारतासाठी एक नवा इतिहास रचला.