
भामरागड वनविभागात वाघाची कातडी जप्त : दोघांना अटक !
दोन आरोपींना अटक, महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभागांची संयुक्त कारवाही..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
गडचिरोली :- (भामरागड ).
२९ नोव्हेंबर २०२३ रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे महाराष्ट्र व छत्तीसगड वनविभाग यांच्या संयुक्त चमूद्वारे एटापल्ली ते जिवनगट्टा रोडवर वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या शामराव रमेश नरोटे (३०) वर्ष रा.वासामुंडी व अमजत खा अमीर खा पठाण (३७) वर्ष रा.एटापल्ली या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
सदर कारवाईत आरोपीकडून वाघाची कातडी, हिरोहोंडा मोटारसायकल व तीन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर वनगुन्हा प्रकरणी आरोपी शामराव रमेश नरोटे व अमजत खा अमीर खा पठाण यांच्याविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४८,४९,ए ४९,बी ५० अन्वये वनगुन्हा क्र.१२/२०२३ ला २९ नोव्हेंबर २०२३ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सदर कारवाही ही रमेशकुमार वनसंरक्षक, गडचिरोली वनव्रत यांचे मार्गदर्शनाखाली भामरागड वनविभागाचे उप वनसंरक्षक शैलेश मीना व उदंती सितानदी टायगर रिजर्व छत्तीसगड वनविभाग उप निदेशक वरून जैन व चमू यांचेद्वारे संयुक्तरित्या कारवाही करण्यात आली. याबाबत राहुल टोलिया उप वनसंरक्षक आलापल्ली, गणेश पाटोळे, विभागीय वनअधिकारी दक्षता यांचे सहकार्य लाभले.
कारवाईत चरण भेडके वनपरिक्षेत्र अधिकारी एटापल्ली, सुशील हलामी, धनिराम पोरेटी व इतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी पुढील तपास अशोक पवार सहायक वनसंरक्षक भामरागड यांचे मार्फत सुरू आहे.