
खळबळजनक बातमी ! रोजगारासाठी गाव सोडले ,पुण्यात येताच बीडच्या तरुणांची हत्या ।
बीड, पुणे
दिनांक 22/01/2025.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथून रोजगाराच्या शोधात पुण्यात आलेल्या तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. बाळासाहेब (बालाजी) मंचक लांडे (२३) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी ( दि. १७) पिंपरी चिंचवड भागातील यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये गंभीर जखमी अवस्थेत लांडे यास दाखल करून दोघांनी पळ काढल्याची माहिती आहे.