
अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद,मुधोली चक नं2 तालुका चामोर्शीच्या वतीने संविधान दिन साजरा.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
चामोर्शी:- दि.26 नोव्हेंबर
चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक नं. 2 येथे संविधान दिवस साजरा.
अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, तालुका चामोर्शीच्या वतीने तालुक्यातील मौजा मुधोली चक नं. २ येथे विर बाबुराव शेडमाके मुख्य चौकात संविधान दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधान उद्देशिकाचे करण्यात आले. व देशातील महामानवांचा जयघोष करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, चामोर्शी युवा तालुकाध्यक्ष सोनु कुमरे, संघटनेचे प्रदेश सचिव राकेश तोरे, जिल्हा सचिव आशिष आत्राम, गावचे सरपंचा अश्विनी कुमरे मॅडम, पोलिस पाटील अश्विनी गोवर्धन मॅडम,ग्राम पंचायत सदस्य देवराव आत्राम, शितल कुमरे, तृप्ती कोवे, प्रतीक्षा कोवे, डिंपल कोवे, भारत कडते, मंगेश ठुसे, सुमित शेडमाके, रमेश सोयाम, पिंटू यांच्यासह गावातील युवक, युवती व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.