Breaking
राजकिय

लोकशाहीच्या रक्षनाकरिता आगामी निवडणुकीला सामोरे जा – महेंद्र ब्राह्मणवाडे, यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

मुख्य संपादक

लोकशाहीच्या रक्षनाकरिता आगामी निवडणुकीला सामोरे जा – महेंद्र ब्राह्मणवाडे, यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

 

फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल – आमदार अभिजीत वंजारी

 

लोकशाहीच्या रक्षनाकरिता आगामी निवडणुकीला सामोरे जा – महेंद्र ब्राह्मणवाडे, यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

 

चामोर्शी तालुका काँग्रेसचा बूथ मेळावा संपन्न

 

गडचिरोली :: ED – CBI सारख्या इतर स्वयत्त संस्थांना हाताशी घेऊन फोडाफोडीचे राजकारण करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असणाऱ्याना सर्वसामान्य जनता आता धडा शिकवणार आहे. तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंघ होऊन बूथ चे सूक्ष्म नियोजन करा व आपला बूथ मजबुत करण्याचा प्रयत्न करा अश्या सूचना आमदार अभिजीत वंजारी यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी द्वारा आयोजित बूथ पदाधिकारी प्रशिक्षण मेळाव्यात ते बोलत होते.

 

लोकशाही मूल्य संपविन्याचा प्रयत्न भाजप सरकार करीत आहे. आगामी काळात देशातील लोकशाही आबाधित ठेवायची असेल तर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या निवणुकीलला पूर्ण ताकतीने सामोरे जाऊन काँग्रेस पक्षाची सत्ता आणावी लागेल असे मत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.

 

 

यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव तथा जि. प्र. डॉ. नामदेव किरसान, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आम. आंनदराव गेडाम, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, LDM लताताई पेदापल्ली, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, नगराध्यक्ष जयश्रीताई वायललवार, उप नगराध्यक्ष लोमेश बुरांडे, तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, बंगाली सेल अध्यक्ष बिजन सरदार, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नगरसेवक सुमेध तुरे, स्नेहाताई सातपुते, वर्षाताई भिवापूरे, माजी जि. प. सदस्य कविताताई भगत, प्रभाकर वासेकर, अनिल कोठारे, नीलकंट निखाडे, रमेश कोडापे, गुरुदेव सातपुते, हरबाजी मोरे, महिला तालुकाध्यक्ष रजनी तम्मीवार, निकेश गद्देवार, प्रफुल बारसागडे, सरपंच जोत्सना गव्हारे, गौराबाई गावडे, अरुण मडावी, विनोद मडावी, निकेश जुवारे, संदीप कोपूलवार, वसंत कोहळे, काशिनाथ चीचघरे, दिगंबर धानोरकर, मुन्ना गोंगले, अमर मगरे, उमाजी जुनघरे, अनुप शिकदर, अविनाश चलाख, तेजस कोंडावार, पंकज खोबे, नेहाल आभारे, रोशन कोहळे, लीलाधर सुरजागडे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे