फुले वार्डात मालमत्ता धारकात केली जात आहे! कर आकारणीची चर्चा…!
कार्यकारी संपादक :- अनुप मेश्राम

फुले वार्डात मालमत्ता धारकात केली जात आहे! कर आकरणीची चर्चा…!
गडचिरोली.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली शहरातील फुले वार्डा त वास्तव्य करणाऱ्या मागासवर्गीय लोकांच्या वस्तीमध्ये वास्तव्य करून कशीबशी आपले आयुष्य जगणाऱ्या कष्टकरी, कामकरी लोकात घरटॅक्स मालमत्ता आकारणीची जो तो जोरात खमंग चर्चा करताना दिसत आहे.
.शासनाने दिलेल्या तटपुंजि पैशावर स्वतःच्या आयुषभर साठविलेल्या कष्टाच्या पैशाची गुंतवणूक करून बांधलेल्या घरकुलावर नगरपरिषदेने हेतूपुरस्पर व सुड बुद्धीने घराची मनमाने मालमत्ता आकारणी करून वार्डतील कष्टकरी, कामकरी, लोकांचे जणू कंबरडेच मोडलेले आहेत.
ज्या लोकांचे नगरपरिषद मध्ये सत्ता वर्चस्व आहे. ज्यांचे राजकीय पक्षाची हितसंबंध जोपासलेले आहेत. ज्यांनी रस्त्याच्या कडेला मोठ मोठाले इमले बांधून मोठे शहरात व्यवसाईक बनलेले आहेत. अश्या लोकांवर नगरपरिषदने लावलेली घरटेक्स मालमत्ता आकारणी ही आमच्या साठी आम्हा कष्ट कऱ्याणऱ्यान साठी संशयित वाटत असल्याची चर्चा कष्टकरी लोकात केली जात आहे.
नगरपरिषेच्या आकारणी विभागात मांडी ठोकून मोज मजेत आयुष्य जगणारी ही शासकीय यंत्रणा मालमत्तेची आकारणी करताना घराची व त्यां त्यां व्यक्तीची तोंडे बघून आकारणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची आकारणी वृत्तपत्रातून प्रकाशित करावी असे कष्ट करी लोकांत बोलले जात आहेत. यांची चोकशी कोण करणार.