
महाराष्ट्र दिनानिमित्त कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण…
गडचिरोली .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 1/5/24 .
महाराष्ट्र दिनानिमीत्त गोंडवाना विद्यापीठ परिसरात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर कुलगुरू डॉ. बोकारे यांनी उपस्थितांना महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत भाषणातून संबोधित केले.
आपल्या शब्दातून मनोगत व्यक्त करतांना बोकारे
यावेळी, प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल हिरेखन, अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे, अधिष्ठाता डॉ. ए.एस.चंद्रमौली, वित्त व लेखा अधिकारी, भास्कर पठारे तसेच विद्यापीठातील सर्व संविधानिक अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.