
पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने उचललं टोकाचं पाऊल ; 45 मिनिटाचं व्हिडीओ बनवत संपवलं जिवन।
दिनांक 2/01/2024.
दिल्ली ,
दिल्लीतील मॉडेल टाऊनमध्ये बंगळुरूच्या अतुल सुभाषच्या आत्महत्येसारखंच प्रकरण समोर आलं आहे. ५४ मिनिटांचा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास करत आहेत. पुनीत खुराना असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. पत्नी मनिका पाहवा हिच्यामुळे तो त्रस्त असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या कपलने आधीच घटस्फोटासाठी अर्ज केला होता.