अर्चना चुधरी (बोरकुटे ) यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित .
ग्रामीण प्रतिनिधी येनापुर :- आकाश बंडावार

साखरा ग्रामपंचायत च्या उपसरपंच अर्चना चुधरी (बोरकुटे ) यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित .
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
ग्रामीण प्रतिनिधी येनापुर
आकाश बंडावार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फौंडेशन दिल्ली यांच्या वतीने ग्रामपंचायत साखरा येथील उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या अर्चना चुधरी बोरकुटे यांना गाव स्तरावर महिला सक्षमिकारण, ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करणे गाव विकासाचे दृष्टीने महत्वाचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्लोबल फौंडेशन दिल्ली यांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .
सदर पुरस्कार दिनांक 03 डिसेंबर 2023 ला दिल्ली येथे constitution club of india येथे विशेष समारंभात मा. अर्जुन राम मेघवाल आदीला फौंडेशन दिल्ली मा. डॉ एस आदिनारायण डॉ. राजीव मेमन डॉ. मनिष गवई यांच्या उपस्थिती मध्ये सदर ग्रामपंचायत साखरा येथील उपसरपंच सौ. अर्चना बोरकुटे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत च्या सदस्य कांचन चौधरी, जयमाला मेश्राम, दिनेश चौधरी, अश्विनी जनबंधू व मित्र परिवार सर्व ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले.