
शेवारी ग्रामपंचायत मध्ये विकास कामांचे भूमिपूजन.
भाग्यश्री ताई आत्राम यांनी दिलेलं शब्द पाळला.
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली .
एटापल्ली:- तालुक्यातील शेवारी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
शेवारी गावात मागील काही महिन्यांपूर्वी भाग्यश्री ताई आत्राम यांनी चावडी सभा घेतली होती.या सभेत या परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या व विकास कामांची त्यांनी यादीच तयार केली होती. नागरिकांच्या मागण्यानुसार त्यांनी त्या त्या गावात आवश्यक ती विकास कामे केली जाणार असल्याचे ग्वाही दिली होती.अखेर त्यांनी दिलेलं शब्द पाळला आहे.
शेवारी ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट बासागुडा, कुकेली आणि शेवारी येथे लाखोंच्या निधीतून विविध विकास कामे केली जाणार असून नुकतेच त्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळताच भाग्यश्री ताई आत्राम यांनी विकास कामांचे भूमिपूजन केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी जि प सदास्य ज्ञानकुमारी कौशी,साई नामेवार,कुकेलीचे पाटील महादू कोवासे, पंकज गावतुरे,भूमिया मोहन कोमटी, सीता झुरे, रावजी झुरे, सुधाकर गोटा,सुधाकर पडो,मंगलु नैताम, बैजू कोवासे, साईनाथ चटारे, महारु पोटावी, सावजी झुरे, साधू नरोटे,जीवन वड्डे, शिवकुमार लोहंबडे आदी उपस्थित होते.