
ज्याला त्याला पडू लागली आता आमदारकीचे स्वप्न !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली.
जिल्ह्यातील नवतरुणांना आमदारकीचे आज काल भव्य दिव्य स्वप्न पडायला लागलेली आहेत.
आमदारकी साठी राजकीय पक्षांची जो तो कुबडी घेऊन आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून व स्वतःची राजकीय प्रसिद्धी करून घेण्याच्या घाईगर्दीत आपली राजकिय वाटचाल सुरु करताना दिसू लागले आहेत.ही स्वप्न बघणारी
काही मोठ मोठाल्या बॅनरच्या, काही पोर्टलच्या तर काही राजकीय, सामाजिक,धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःच्या राजकिय प्रसिद्धीसाठी स्वतःवर . व इत्तरावर लाखो रुपयांची उधडन करताना खुल्ले आम दिसत आहेत
आयुष्यामध्ये ज्यांनी गरिबांच्या झोपडीत शिरकावही केलेला नसेल .गरीब,निराधारांच्या सुख दुःखामध्ये. किंव्हा त्याच्या नाते वाहीकाना मरणोत्तर खांधाही दिलेला नसेल..आज जो. तो. तुमच्या आमच्या झोपडीमध्ये हळूच शिरकाव करून आमच्या आयुष्याची बेरीज.वजाबाकी करुन,आस्तेने आमची तुमची विचारपूस करताना दिसू लागलेले आहेत. आमच्या कुणी खांध्यावर, कुणी पाठीवर हात ठेवून व मदतीचा हात घालून मी तुमचाच आहे. असे छाती ठोकपणे सांगायला सुरुवात केलेली आहेत.
आमच्याकडे तूम्ही केव्हांही या मी तूमच्या सोबतीला आहे.असे रंगीबेरंगी आमिष दाखवून तूमची आमची दिशाभूल करून प्रसिद्धीचा टाहो सतत फोडताना दिसत आहेत .
टाहोरुपी आमदारकीचे स्वप्न रंगविणारे राजकीय पटलावर कितपत यशस्वी होतील येणारा काळच सांगेल.आम्ही देत आहोत सावधानतेचा इशारा!