धानोरा तालुक्यातील निमणवाडा विकासापासून कोसो दूर!
दणका कायद्याचा न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली
दिनांक 28/11/2024
धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी निमंणवाडा गाव आजही विकासापासून कोसो मैल दूर आहे.
निमणवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येत चार गावे येत असून या चारही गावाची एकूण लोकंसंख्या १९०० असून या निमनवाडा गाव परिसरात आदिवासीची लोकांची लोकसंख्या इतर लोकांपेक्षा जास्त असून सुधा आजही आदिवासी जमात विकासापासून वंचित आहेत.
गाव परिसरात रस्त्याची समस्या अतिशय गंभीर असून. येण्या जाण्यासाठी वाटसरूंना प्रवास करणे सुद्धा कठीण होत आहे तसेच जल स्वराज्य योजने अंतर्गत गाव परिसरात राबविण्यात आलेली जलस्वराज्य योजना ही कूचकमी ठरलेली असून गाव परिसरात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली असून लोकांना पाण्यासाठी इतरत्र भटकण्याची वेळ आलेली आहे.
तरी जिल्हा परिषद प्रशासनाने निमणवाडा या गावाकडे जातीने लक्ष घालून गाव परिसरात विकासाची गंगा आणावी गावकऱ्यांना होत असलेला मानसिक व शारीरिक त्रास दूर करण्याची मागणी निमनवाड्याचे उपसरपंच यांनी आपले मनोगत आमच्या प्रतिनिधी जवळ व्यक्त केले.