कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत ! आमदाराची ,मंत्र्याची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते
मुख्य संपादक

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत
मंत्र्याची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते
आमदाराची पोरगी काय म्हणते कंत्राटी नवरा नाय म्हणते
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राठी कर्मचाऱ्यांनी शासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी स्थाई करण्याच्या न्यायिक मागणीसाठी २५ आँक्टोबर पासुन गडचिरोली जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्यातील अधिकारी कर्माऱ्यांनी संप सुरू केला आहे.काही भागातील कंत्राटी डॉ. पासुन तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याचा समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य व रुग्णालयाच्या रुग्णाचा जीव टांगणीला लागला आहे.
आंदोलकांच्या माहितीनुसार ओडिसा, पंजाब, राजस्थान ,मणिपूर ,व इतर राज्यांमध्ये राष्ट्रीय कंत्राटी अभियानातील कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थाई केलें आहे महाराष्ट्रातही या अभियानातील कंत्राटी कर्मचऱ्यांना स्थाई करण्याचे वारंवार आश्वासन दिले गेले परंतु केले नाही . त्यामुळे १६ आँक्टोबरला नागपुरातील संविधान चौकात आंदोलने केली होती.त्यात मोठ्यासंख्येने कंत्राटी कामगार सहभागी होते तेव्हा रुग्णालयातील सेवा कोलमडली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी आंदोलन सुरू केले यावेळी मागण्या पूर्ण न झाल्यामुळे सर्व कमचारी संपावर गेले आहे तसेच १७ वर्षापासून समयोजनेच्या प्रतीक्षेत असलेले जिल्यातील पाचशेच्या वर कर्मचारी संपत सहभागी झाले या मागणीसाठी २५ आँक्टोबर पासुन बेमुदत संप पुकारला आहे.या संपाचा परिणाम आरोग्य सेवेवर झाल्याचे पाहायला मिळते. राष्टी्य आरोग्य अभियानाअंतर्गत गडचिरोली येतील जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णांलय ग्रामीण,प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचारी मानधनात काम करावे लागत आहे .शासन समायोजन करावे अशी मागणी केली होती परंतु अद्याप समयोजांचा प्रश्न पूर्ण केले नाही याकडे शासनाने लक्ष्य वेधावे .शासनाचे लक्ष वेधण्यासाठी डॉ. कर्मचारी संप पुकारला आहे शासन सेवेत सामावून घेण्याची मागणी करीत कर्मचाऱ्यांनी. एकच नारा कायम करा . दिलेला आहे ,आमदाराची पोरगी काय म्हणते कंत्राटी नवरा नाय म्हणते ,. अश्या घोषणा देत शासनाचे लक्ष्य वेधले .
१७ वर्षापासून कंत्राटी सेवेत काम करत असून सेवेत कायम करावे या मागणीसाठी अमरावती ,जिल्यातील १३४५ कंत्राटी आरोग्य सेविका व कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने मेळघाटसह अमरावती जिल्ह्यात आरोग्य सेवा कोलमडली आहे आमदार खासदार मंत्री नाशिक जिल्हा गाव बंदीचा निर्णय घेतला आहे .
आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कमचाऱ्याना दिलेले आश्वासन पूर्ण करावे.
सर्व कंत्राटी कामगार संपावर गेल्याने आरोग्य यत्रणा ठप्प झाली आहे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जे आश्वासन मागील अधिवेशनामध्ये दिले होते ते आश्वासन पूर्ण करावे.तसेच सेवेमध्ये कायम करावे अशी मागणी आरोग्य कर्मचारी यांनी केले आहे .जोपर्यंत मागण्या पूर्ण होत् नाही तोपर्यंत बेमुदत बंद आंदोलन सुरू राहील असा इशारा शासनाला कंत्राटी कर्मचऱ्यांनी दिला आहे.