मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस शिवाय कोणीही मान्य नाही, आरएसएसचा भाजपला संदेश
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
दिनांक 2/12/2024
मुंबई ,
राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. भाजपा राज्यात एक नंबरचा पक्ष ठरला आहे. भाजपाने १३२ जागांवर विजय मिळवला आहे. दरम्यान, काही दिवसापासून मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, नवीन मुख्यमंत्रिपदाच्या निवडीबाबत भारतीय जनता पक्षांतर्गत सुरू असलेल्या चर्चा आणि जातीय समीकरणांच्या आधारे निर्णय घेण्याची शक्यता यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.