मुंबई
आई वडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलीला मुलभुत अधिकार ,सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल..
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

आई वडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलीला मुलभुत अधिकार ,सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल..
दि.11/01/25.
मुंबई ,
मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणे आईवडिलांची जबाबदारी आहे की नाही, याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुलीला शिक्षणासाठी आईवडिलांकडे पैसे मागण्याचा मूलभूत अधिकार आहे. आईवडीलही मुलीला शिक्षणाचा खर्च देण्यासाठी कायद्याने बांधील आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. २६ वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या जोडप्याच्या घटस्फोट प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
girlchildeducation #supremecourt