Breaking
आरोग्य व शिक्षणगडचिरोली

तंत्रज्ञान संबंधी कौशल्य ही काळाची गरज: मा.अविश्यांत पंडा जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन

वार्षिक महोत्सव ‘कौशल्यस्पर्श’  चा जल्लोषात समारोप

 

तंत्रज्ञान संबंधी कौशल्य ही काळाची गरज: मा.अविश्यांत पंडा जिल्हाधिकारी प्रतिपादन …

वार्षिक महोत्सव ‘कौशल्यस्पर्श’  चा जल्लोषात समारोप

गडचिरोली,

आदर्श पदवी महाविद्यालयाचा तीन दिवसीय वार्षिक महोत्सव ‘ कौशल्यस्पर्श २०२४ –२५ ’ चा बक्षिस वितरण व समारोप समारंभ दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी मा. अविश्यांत पंडा (भा.प्र.से) जिल्हाधिकारी व दंडाधिकारी,गडचिरोली.)यांच्या उपस्थितीत थाटात पार पडला. या प्रसंगी मा.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत अल्फा अकॅडमी तसेच आदर्श पदवी महाविद्यालयात चाललेल्या तंत्रज्ञान आधारित अभ्यासक्रमांचा आढावा घेत त्यांच्या आवश्यकतेवर भाष्य केले.

तीन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी दिनांक १२ फेब्रुवारी ला क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये बॅडमिंटन, क्रिकेट,रस्सीखेच,१०० मीटर व रिले रेस इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या या दिवशी विशेष अतिथी म्हणून मा.श्रीराम पाचखेडे (जिल्हा नियोजन अधिकारी,गडचिरोली) व योगेंद्र शेंडे (मा.सहा.आयुक्त,कौशल्य विकास,गडचिरोली)उपस्थित होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक १३ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन ॲड. आशिष जयस्वाल (मा.राज्यमंत्री तथा सहपालक मंत्री,गडचिरोली) यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन तसेच महाविद्यालयाची वार्षिक पुस्तिका ‘कौशल्यस्पर्श’ चे विमोचन करण्यात आले .

वार्षिक महोत्सवाच्या तृतीय दिवशी,१४ फेब्रुवारी ला तीन दिवसीय कार्यक्रमाची निरोप समारंभ व बक्षिस वितरण सोहळ्याने सांगता करण्यात आली.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य (प्र.) डॉ. कृष्णा कारू,विशेष अतिथी म्हणून अविश्यांत पंडा (भा . प्र.से) जिल्हाधिकारी व दंडाधिकारी,गडचिरोली.) डॉ.मनीष उत्तरवार (मा.संचालक न. ना. व.सा. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली),श्री.योगेंद्र शेंडे (मा.सहा.आयुक्त,कौशल्य विकास,गडचिरोली) , डॉ.संजय डाफ  ( प्राध्यापक,गोंडवाना विद्यापीठ), डॉ. मोहम्मद सर्फराज अन्सारी (प्राध्यापक,गोंडवाना विद्यापीठ), मा.नंदकिशोर मेश्राम ( प्रा.गोंडवाना विद्यापीठ) व मा.मनीष तिवारी (सीईओ आणि संस्थापक learnQoch,   मुंबई ) इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

आदर्श पदवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कृष्णा कारू यांनी समारोप समारंभाच्या प्रास्ताविकातून अल्फा अकॅडमी व महाविद्यालयाच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती दिली, मा.मनीष तिवारी यांनी तंत्रज्ञानाचे बदलते विश्व व त्यानुसार व्यक्ती मध्ये परिवर्तनाची आवश्यकता यावरती भाष्य केले. कार्यक्रमात घेतल्या गेलेल्या फॅशन शो स्पर्धेमधे मा.मनीष उत्तरावर ( मा.संचालक न. ना. व.सा. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वेशभूषेसंबंधी प्रश्न विचारले .सर्व अतिथींनी विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करत कार्यक्रमाचा आनंद घेतला.या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष सत्कारमूर्ती :
वार्षिक महोत्सवाच्या निमित्ताने अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या बक्षिस वितरण समारंभात विजेत्यांव्यतिरिक्त राज्यस्तरीय मिनी गोल्फ स्पर्धेत प्रथम स्थान मिळविल्याबद्दल आदर्श पदवी महाविद्यालयाचा विद्यार्थी वैभव देवजी नैताम, महाविद्यालयाची वेबसाईट निर्माण करण्यासाठी अल्फा अकॅडमी चा विद्यार्थी कुणाल कन्नाके व राज्यसेवा एम पी एस सी गट क मधे निवड झाल्याबद्दल आदर्श पदवी महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक सुदर्शन जानाकिवार यांचा सत्कार करण्यात आला

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे