
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री ! आतीशी यांच्यासह आणखी पाच मंत्र्यांनी घेतली शपथ ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
दिल्ली .
दिनांक 21/09/2024.
आप नेत्या आतिशी यांनी शनिवारी दिल्लीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दिल्लीतील कालकाजी मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झालेल्या आतिशी या केजरीवाल सरकारमध्ये बहुतांश खाती सांभाळत होत्या. आतिशी यांना सुरूवातीपासूनच अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जायचे. केजरीवाल यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यापासून आतिशी यांना दिल्लीचे पुढील मुख्यमंत्री बनवण्याची शक्यता वर्तवली जात होती. अपेक्षेप्रमाणे तसेच घडले. आप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आतिशी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आणि आज दुपारी साडेचार वाजता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. #AtishiMarlena