
प्रॅक्टिस करताना 270 किलोचा राँड मानेवर पडल्याने गोल्ड मेडलिस्ट पाँवर लिफ्टर यष्टिका आचार्यचा मृत्यू
दिनांक 19/2/2025
राजस्थान ,
राजस्थानमधील बिकानेर शहरात झालेल्या एका दुर्दैवी घटनेत, ज्युनियर नॅशनल गेम्सच्या सुवर्णपदक विजेत्या महिला पॉवरलिफ्टरचा सराव दरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत पॉवरलिफ्टरचे नाव यष्टिका आचार्य असे आहे. ती १७ वर्षांची होती. ही घटना घडली तेव्हा यष्टिका जिममध्ये वेटलिफ्टिंगचा सराव करत होती. यावेळी तिच्या मानेवर रॉड पडल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेत तिच्या प्रशिक्षकालाही दुखापत झाली.