Breaking
गडचिरोलीराजकिय

जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना जिल्हा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेव किरसान , जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे ! 

मुख्य संपादक

 

जिल्ह्यातील विविध समस्यांना घेऊन जिल्हाधिकार्यांना निवेदन देताना जिल्हा महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ. नामदेव किरसान , जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी महेंद्रभाऊ ब्राह्मणवाडे ! 

दणका कायद्याचा डिजिटल न्युज .

 

गडचिरोली

दिनांक २७/५ /२४ .

 जिल्ह्यातील वारंवार रानटी हत्तीचे आगमन आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान यामुळे शेतकरी हावालदिल झाला असून, रानटी हत्तीच्या हल्ल्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.

 

 

सोबतच रानटी हत्तीचा बंदोबस्त करण्यात यावा, याशिवाय जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक नागरिकांच्या घराची नुकसान झाली असून त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी, उन्हाळी धान खरेदी केंद्र तात्काळ सुरु करून हमीभावाप्रमाणे सुरु करण्यात यावी यासह गडचिरोली शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक भागात हलक्या पावसानेही पाणी जमा होऊन त्याठिकाणी नागरिकांना ये जा करण्याकरिता त्रास सहन करावा लागतो अश्या रस्त्यावर रस्ते वाहतूक विभागामार्फत मान्सून पूर्व दुरुस्ती करण्यात यावी अशा विविध समस्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.

 

 

 

यावेळी जिल्हाउपाध्यक्ष काँग्रेस कमिटी गडचिरोली नेताजी गावतुरे, जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष परिवहन सेल रुपेश टिकले, अध्यक्ष सोशल मिडिया संजय चंनेभ, नदीम नाथानी, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येनप्रेड्डीवार, घनश्याम मुरवतकर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे