गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र ओ.पी.डी. चालते टेक्निशियनच्या भरोशावरती
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम

गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र ओ.पी.डी. चालते टेक्निशियनच्या भरोशावरती
दणका कायद्याचा डिजिटल न्यूज.
कार्यकारी संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली. दि.२७ जुलै24
गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र ओ.पी.डी. ही अनेक दिवसापासून कार्यरत टेक्निशियनच्या भरोश्यावर चालताना दिसत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र रुग्णालयामध्ये पाच ते सहा नेत्र चिकित्सक कार्यरत असताना हे चिकित्स्क रुग्णालयातीलओ.पी.डी.मध्ये एकही तज्ञ डॉक्टर बसताना व रुग्णावर उपचार करताना कधीचं दिसत सुद्धा नाही. फक्त दिसतात यानी सुरू केलेल्या आपल्या खाजगी रुग्णालयामध्ये.प्रॅक्टिस करतांना.
गडचिरोली नेत्र ओ.पी.
डी.मध्ये दोन टेक्निशियन हे नियमित कार्यरत असताना सुध्दा चार टेक्निशियन अतिरिक्त प्रभार सांभाळताना दिसत आहेत. रुग्णालयातील कार्यरत अतिरिक्त टेक्निशियनच्या मनमर्जी मुळे त्यांच्या त्या त्या कार्यरत परीसरातील नेत्र ओ.पी.डी ओसाळ पडल्यामुळे रूग्णांना नाहाक त्रास होताना दिसत आहे.
तसेच रुग्णालयात नेत्र चिकित्सा करण्यासाठी आलेल्या रुग्णांना नेत्र टेक्निशियन चार ते पाच महिन्याचां कालावधी देत असल्यामुळें अनेक बाहेरील गरीब,निराधार रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेपासून आज मुकावे लागत असून तपासणी साठी रुग्णालयातआलेल्या .रूग्णांना आल्या पावलांनी त्यांना आप आपल्या गावाकडे परतावे लागते प्रसंगी आर्थिक भुर्दंड सोसावे लागते.
रुग्णालयतील ओ.पी.डी.मधे दिसणारे हे चार अतिरीक्त टेक्निशियन हे कुणाच्या आशीर्वादाने रुग्णालयामध्ये दडी मारून बसताना दिसत आहेत.आमचे जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली रुग्णालयामध्ये फेरफटका मारला असता नेत्र ओ.पी.डी. मधील सदर प्रकरण उघडकीस आलेले आहे. चारही
अतिरिक्त टेक्निशियनना त्वरित हाकलण्याची मागणी दलित पॅंथर जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने केलेली आहे.