विज कंत्राटी कामगार यांच्या बेमुदत संपाला राज्याचे विरोधी पक्षनेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांचा पाठिंबा
मुख्य संपादक

विज कंत्राटी कामगार यांच्या बेमुदत संपाला राज्याचे विरोधी पक्षनेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांचा पाठिंबा
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
गडचिरोली/
दिनांक ८/ ३/२०२४.
आज गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून सुरू केलेल्या बेमुदत संपाला राज्याचे विरोधी पक्षनेते मा. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यासोबत उपस्थित राहून पाठिंबा दिला.
वाढती महागाई आणि अल्प वेतनामुळे या कर्मचाऱ्यांचा स्वतः सह कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारी असो की खासगी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय ह्या सरकारने घेतले नाही. उद्योगपतींचे कर्ज सहज माफ केले जाते मात्र कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मात्र पैसे नसल्याचे सरकार सांगते.
यावेळी गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.नामदेव किरसान, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनरावजी सावसाकडे, युवक काँग्रेसचे माझे सहकारी विश्वजीत कोवासे तसेच गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.