
चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी येथे जागतिक महिला दिन संपन्न , माता भगिनींशी संवाद साधताना – शिवानी वडेट्टीवार
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर :-
दिनांक 8/मार्च2024.
चंद्रपूर शहरातील सिस्टर कॉलनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात माता – भगिनींशी संवाद साधला.
आज देश आणि राज्यात प्रतिनिधीक स्वरूपात संधी मिळाल्या तरी आपण महिला हुरळून जातो. मात्र तसे न करता आपली आधी आबादी आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक क्षेत्रात ५० टक्के संधीचा आग्रह धरला पाहिजे. विद्यमान भाजपा सरकारची मानसिकता महिला विरोधी असून बलात्कार पीडितेच्या आरोपींची शिक्षा माफ करण्याचे पाप या सरकारने केले, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव रोशन करणाऱ्या कुस्तीपटूचे लैंगिक शोषण करणारा भाजपचा लोकप्रतिनिधी आहे. यासह अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात या सरकारच्या लोकप्रतिनिधींनीच महिलांचे शोषण केले आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत अशा सरकारला घरी बसवण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला पाहिजे.
कार्यक्रमानंतर स्थानिक महिलांनी भेट घेत अरुंद इरई नदीमुळे घरात येणाऱ्या पाण्याची समस्या मांडली. या नदीच्या खोलीकरण आणि सौंदर्यीकरण करण्यासाठी तत्कालीन पालकमंत्री मा.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना आणून पुढाकार घेतला होता. मात्र सरकार गेल्यानंतर सध्याचे पालकमंत्री यांनी यावर काहीच कार्यवाही केली नाही. असे असले तरी आम्ही हा मुद्दा लावून धरू आणि तुमची समस्या दूर करू असा शब्द दिला.
तसेच आशा सेविकांनी भेट घेत त्यांनी केलेल्या आंदोलनाची माहिती दिली. २ महिन्यापेक्षा अधिक काळ आंदोलन करूनही त्यांच्या पदरी निराशाच पडली. त्यामुळे हताश झालेल्या आशा सेविकांनी ह्या सरकारला मानधन वाढ आणि त्यांच्या इतर मागण्यासाठी आपण पाठपुरावा करावा असा आग्रह त्यांनी केला. मी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने यावर आवाज उठवत आहे. तसेच तुमच्यासाठी पुन्हा एकदा लढा उभारण्याची माझी तयारी असल्याचे यावेळी त्यांना सांगितले.