Breaking
गडचिरोली

डॉ.आंबेडकरांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज – कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे

मुख्य संपादक

 

 

डॉ.आंबेडकरांचे विचार कृतीत उतरविण्याची गरज – कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे

 

डाॅ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन.

 

गडचिरोली, दि.14

 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान हे भारतातील प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक समाज घटकांसाठी राहिलेले आहे. डॉ.आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मुलतत्वे दिली. त्यांनी विविध विषयावर विचार मांडले असून त्यांचे समग्र विचार कृतीत उतरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे होते. व्यासपीठावर प्र-कुलगुरु डाॅ. श्रीराम कावळे, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख प्रा.दिलीप बारसागडे उपस्थित होते. तसेच वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे, उपकुलसचिव कामाजी देशमुख, सहायक कुलसचिव देवेन्द्र मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे समन्वयक डॉ. धनराज पाटील आदी उपस्थित होते.

कुलगुरु डाॅ. प्रशांत बोकारे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सर्व समाजाने परीक्षण करण्याची गरज आहे. आपल्या वाणीमध्ये, विचारांमध्ये डॉ. आंबेडकर आहेत. मात्र, आपल्या करणीत डॉ. आंबेडकर आहेत का? याचा प्रत्येक भारतीयाने विचार केला पाहिजे. डॉ. आंबेडकरांनी या देशाला घटना दिली, स्वातंत्र्य, समता आणि बंधूंचा ही तत्वे दिली. यापूर्वी फ्रेंच राज्यक्रांतीने ही तत्वे दिली होती. या तत्त्वाचा खऱ्या अर्थाने दस्तऐवजीकरण आणि समाजामध्ये त्या तत्त्वांना प्रेषित करणे, समाज त्या तत्त्वावर चालविण्यास भाग पाडणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. हे डाॅ. आंबेडकरांचे भारतीय समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे योगदान असल्याचे कुलगुरू डॉ. बोकारे म्हणाले.

प्र-कुलगुरु डाॅ. कावळे म्हणाले, डाॅ.आंबेडकरांनी आयुष्यभर समाजातील वंचित, शोषित, पीडित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. देशाला गुलामगिरीतून बाहेर काढले. त्यांचे राहिलेले अपुर्ण कार्य आपल्याला पुर्ण करण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी देशाला संविधान दिले. त्यामुळे भारताची लोकशाही आजही बळकट आहे. त्यांच्या जयंतीनिमीत्त महामानवाने केलेल्या कार्याला ऊजाळा देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविकेत बोलतांना, प्रा.दिलीप बारसागडे म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य हे सर्वव्यापी असून समाजातील शेवटच्या घटकातील तळागाळातील लोकांसाठी होते. त्यांनी वंचित व शोषितांना न्याय देण्याचे कार्य केले. समता मुलक समाजाची निर्मिती करण्यासाठी बाबासाहेबांचे आयुष्य गेले. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर करणे महत्त्वाचे असून त्यांचे विचार कृतीतून उतरवण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

 

 

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे प्रमुख दिलीप बारसागडे यांनी केले. तर आभार डाॅ. धनराज पाटील यांनी मानले.

प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

कार्यक्रमाला प्रा. डाॅ. निळकंठ नरवाडे, डाॅ.अनंता गावंडे, प्रा.रोहित कांबळे, प्रा.विकास चित्ते, प्रा.अमोल चव्हाण, प्रा.अतुल गावस्कर, तसेच प्रशांत पुनवटकर, रंजीत रायपूरे, योगिता कुंभारे, सतीश ब्राम्हणवाडे आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे