देश-विदेश
अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी महेंद्र सतेंद्र दास यांना ब्रेन स्ट्रोक प्रकृती गंभीर
मुख्य संपादक

अयोध्येच्या राम मंदिरातील मुख्य पुजारी महेंद्र सतेंद्र दास यांना ब्रेन स्ट्रोक प्रकृती गंभीर।
दिनांक 4/2/2025.
अयोध्या ,
अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी महंत सत्येंद्र दास यांना ब्रेन स्ट्रोक म्हणजेच मेंदुचा गंभीर आजार झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्येंद्र दास यांची प्रकृती अतिशय नाजूक आहे. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (SGPGI) रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. महंत सत्येंद्र दास हे ८५ वर्षांचे असून रविवारी ब्रेन स्ट्रोक आल्याने तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सोमवारी सांगितले.