देश-विदेश
चिनने बनवली मन वाचणारी मशीन; मानसाच्या मनात काय चाललंय हे आता सेकंदात समजणार ।
मुख्य संपादक:- संतोष मेश्राम

चिनने बनवली मन वाचणारी मशीन; मानसाच्या मनात काय चाललंय हे आता सेकंदात समजणार ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
चिन ,
दिनांक 8/01/2025.
मागच्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनने मोठी झेप घेतली आहे. अमेरिका, जपान आणि युरोपमधील विकसित देशांसमोर या क्षेत्रात चीनने मोठं आव्हान उभं केलं आहे. दरम्यान, चिनी स्टार्टअप न्यूरोस्पेसने गुरुवारी आपल्या दोन यशस्वी शोधांची घोषणा केलली आहे. कंपनीच्या ब्रेन कॉम्प्युटर इंटरफेस (बीसीआय) डिव्हाइसने समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे हे अचूक ओळखले.
तसेच दुसऱ्या चाचणीमध्ये मेंदूतील इशाऱ्यांवरून चिनी भाषेचा निर्धारित वेळात उलगडा केला. या दोन शोधांमुळे चीनने जगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.