
येनापुर येथे भिमा कोरेगाव शौर्य दिन साजरा…..
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
येनापुर :-
आज दिनांक 1 जानेवारी 2024 ला येनापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे 206 वा शौर्य दिन दिवस साजरा करन्यात आला.
चौकातील मुख्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रमुख अध्यक्ष यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून मालार्पन करण्यात आले. त्यानंतर सामुहिकरित्या विजयस्तंभाला मानवंदना दिली.
यावेळी सिद्धार्थ बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष मा. जैसुक गेडाम. पंचशील बौद्ध समाज मंडळाचे अध्यक्ष मा. प्रमोद उमरे. तसेच प्रबुद्ध युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष अंकुश निमसरकार समाजाचे संपुर्ण पदाधिकारी व बौद्ध उपासक तथा उपासिका उपस्थित होते. व कार्यक्रम पुर्ण करण्यासाठी समाजातील युवा मंडळी यांनी मोलाचे सहकार्य केले.