राष्ट्रवादी महिला काँग्रेसपाटीँच्या जिल्हाध्यक्षपदी संगीता मंजुमदार यांची नियुक्ती
येनापुर प्रतिनिधी आकाश बंडावार

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पाटिँच्या जिल्हा अध्यक्षपदी संगीता मंजुमदार यांची नियुक्ती..
राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी संगीता मंजुमदार यांची नियुक्ती..
गडचिरोली.
दि28 जाने 2024 .
चामोर्शी :- चामोर्शी येथे नवनियुक्त महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई मुजुमदार यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री .अतुल भाऊ गण्यारपवार हे उपस्थित होते .व त्यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या महिला उपस्थित होत्या. राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल संगीताताई मुजुमदार त्यांचे सुद्धा स्वागत करण्यात आले.
तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाटिँचे जिल्हाध्यक्ष श्री. अतुल भाऊ गण्यारपवार यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी महिलांना मार्गदर्शन केले त्यानंतर चामोर्शी येथे स्वागत समारंभाच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील, तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, चामोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालक, सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे संचालक, सेवा सहकारी संस्था चामोर्शीचे संचालक तसेच चामोर्शी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच जिल्ह्यातील महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थितीत होती.