
चंद्रपूर: पोलीस बनला चोर, चक्क पोलीस कर्मचारी करत होता घरफोड्या करून चोरी !
दणका कायद्याचा डिजिटल न्युज
चंद्रपूर :- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. चंद्रपूर पोलिस दलात स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा प्रताप समोर आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने चक्क घरफोड्या करून चोरी करण्याचा आरोपाखाली नरेश डाहुले याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला पोलीस कर्मचारीच घरफोडीचा आरोपी निघाला आहे. चंद्रपूर पोलीस दलात हा धक्कादायक प्रकार उजेडात आलाय. रामनगर पोलिस स्टेशन येथील पथकाने आरोपी पोलीस कर्मचारी नरेश डाहुले याला अटक केली आहे.
चंद्रपूर शहरातील सहकारनगर भागात काही दिवसांपूर्वी 4 हजारांची तर सप्टेंबर महिन्यात शहरातल्याच उपगनलावार लेआऊट मध्ये 80 हजारांची घरफोडी झाली होती. रामनगर पोलिसांच्या तपासात या दोन्ही घरफोडया नरेश डाहूलेने केल्याचं निष्पन्न झाले.
चंद्रपूर पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी चोर नरेश डाहुले याला ऑनलाइन शेयर ट्रेडिंगच्या सवयीमुळे आरोपी पोलीस कर्मचाऱ्यावर 22 लाखांचं कर्ज झालं होतं. त्यातून त्याने हे कृत्य केल्याची माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. नरेश डाहुलेच्या अटकेमुळे चंद्रपूर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे.