देश-विदेश
” उत्तर गाझा खाली करा ” IDF ची वाँनिँग ! इस्त्रालयकडुन लेबनाँन मध्ये मुत्युचं तांडव ,हिजबुल्लाहचा पलटवार ।
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम ।

” उत्तर गाझा खाली करा ” IDF ची वाँनिँग ! इस्त्रालयकडुन लेबनाँन मध्ये मुत्युचं तांडव ,हिजबुल्लाहचा पलटवार ।
दणका कायद्याचा डिजिटल न्युज .
मुख्य संपादक :- संतोष मेश्राम .
दिनांक 6/10/2024.
इस्रायल लेबनॉनवर सातत्याने जबरदस्त हल्ले करत आहे. इस्त्रायली लष्कराने बेरूतच्या दक्षिण उपनगरावर 30 हून अधिक हवाई हल्ले केले आहेत. हे आतापर्यंतचे सर्वात हिंसक हल्ले होते, असे लेबनीज मीडियाने म्हटले आहे. तर आपण हिजबुल्लाहच्या शस्त्रास्त्रांच्या डेपोला लक्ष्य केल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
इस्रायली लष्कराने रविवारी (6 ऑक्टोबर) सकाळी एका मशिदीवर हवाई हल्ला केला. आयडीएफने केलेल्या दाव्यानुसार, हमास मशिदी आणि शाळाचा वापर कमांड आणि कंट्रोल सेंटर म्हणून करत आहे. या हवाई हल्ल्यात 24 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.